Nashik Crime News | अशोक खरातप्रमाणे ज्येष्ठ पत्रकाराचे कुकर्माचे व्हिडिओ ऑफिस बॉयने आणले उघडकीस; 8 महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या ज्येष्ठ पत्रकाराला अटक

Nashik Crime News | Like Ashok Kharat, videos of an elderly journalist's misconduct were brought to light by the office boy; senior journalist who sexually exploited 8 women arrested

नाशिक : Nashik Crime News | राज्यभरात नाशिकमधील अशोक खरात याचे प्रकरण गाजत असताना महिलांचे लैंगिक शोषणाचा आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. अशोक खरात याचे प्रकरण जसे ऑफिसबॉयने व्हिडिओ शुटिंग करुन उघडकीस आणले होते, त्याचप्रमाणे या पत्रकाराचे कुकर्म  ऑफिसबॉयने व्हिडिओ शुटिंग करुन उघडकीस आणले आहे.

रवींद्र गणपत एरंडे Ravindra Ganpat Yerande (वय ६३, रा. श्री विद्या नीलकंठेश्वरनगर, सातपूर, नाशिक) असे अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. रवींद्र एरंडे याने नाशिक मधील अनेक नामवंत वृत्तपत्रात काम केले आहे. सध्या त्याचे युट्युब चॅनेल आहे. अशोक खरात याच्या कार्यालयात काम करणार्‍या ऑफिसबॉयने महिलेकडे ज्याप्रमाणे खंडणीची मागणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते़ तसेच रवींद्र एरंडे याच्या कार्यालयात काम करणार्‍या आकाश बकरे याने एरंडे याला फोन करुन १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्याकडे खरंच फोटो, व्हिडिओ आहेत का, हे पाहण्यासाठी त्याला १० हजार रुपये दिले. त्याने न्युड फोटो व व्हिडिओ रवींद्र एरंडे याला व्हॉटसअ‍ॅप केले. त्यानंतर रवींद्र एरंडे यांनी खंडणीची फिर्याद दिली. सातपूर पोलिसांनी सापळा रचून आकाश पुंडलिक बकरे Akash Pundlik Bakre (वय २८, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) याच्यासह त्याच्या ४ चौघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत खरात प्रमाणे रवींद्र एरंडे ने महिलांचे लैंगिक शौषण केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या फिर्यादीविरुद्धच गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

रवींद्र एरंडे याने फिर्यादी महिलेच्या मुलाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्या अनुसुचित जातीच्या असल्याचे माहिती असतानाही त्यांच्याशी वारंवार शरीरसंबंध केले. त्यांच्याशी केलेल्या शरीरसंबंधांचे मोबाईलद्वारे चोरुन रेकॉर्डिंग केले. त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता फसवणूक केल्याची या महिलेने फिर्याद दिली आहे.

सातपूर पोलिसांनी सोमवारी रवींद्र एरंडे याला न्यायालयात हजर केले.  अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली. यावेळी अभियोग कक्षाच्या सहाय्यक संचालक अ‍ॅड. किरण बेंडभर उपस्थित होत्या.

पोलिसांनी रवींद्र एरंडे याच्या कार्यालयाची झडती घेतली. त्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, हस्त लिखित डायरी, नोंदी सापडलेल्या आहेत. त्याच्या कार्यालयात सापाची कातडी, पक्षांचे अवयव, कवडी अशी अंधश्रद्धा पसरवणारे व जादूटोणा सारख्या प्रथांचे उदात्तीकरण, अनुकरण व प्रसार करणारे साहित्य सापडले आहे. कार्यालयातून जप्त कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क यामधील डेटाची तपासणी सुरु आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे.  गुन्ह्यात यापूर्र्वी हस्तगत पेनड्राइव्ह व साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना विश्वासात घेऊन केलेल्या तपासात या फिर्यादीशिवाय आणखी ७ महिलांची माहिती प्राप्त झाली आहे.

आरोपींने महिलांचे अश्लिल चित्रणाची महिलांना भीती दाखवून खंडणी वसुल केली आहे याचा तपास करायचा आहे. पिडित ७ महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे तपास करणे आवश्यक आहे. पिडित महिलांचे अश्लिल व्हिडिओ व फोटो कोठे कोठे व कोणत्या इलेक्ट्रॉनिक साहित्य साधनामध्ये जतन करुन ठेवलेले आहेत, याबाबत आरोपीला अधिक विश्वासात घेऊन सविस्तर तपास करायचा आहे, असे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

You may have missed