Pune Crime News | नंणदेच्या घराला रंग देण्यासाठी, तिच्या सासुचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी सुनेचा छळ; पतीच्या दृष्टीने पत्नी म्हणजे फक्त एटीएम, पतीसह सासु, सासऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | लग्नानंतर घरातील खर्चासाठी, भाड्याचे रुमचे डिपॉझिट भरण्यासाठी इतकेच काय नंणदेच्या घराचे रंग काम करण्यासाठी आणि तिच्या सासुच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी वेळोवेळी अडीच लाख रुपये घेऊन आयटी कंपनीत नोकरी करणार्या सुनेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षाच्या विवाहितेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिचे पती सुबोध सुभाष काळे Subodh Subhash Kale (वय ३०), सासु विमल सुभाष काळे Vimal Subhas Kale (वय ५५), सासरे सुभाष बळीराम काळे Subhas Baliram Kale (वय ६५, सर्व रा. दत्तनगर, बार्शी, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ मे २०२५ ते २९ मार्च २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हिंजवडी येथील आय टी कंपनीत नोकरी करतात. त्यांचे सुबोध काळे याच्याबरोबर २० मे २०२५ रोजी बार्शीतील आदर्श मंगल कार्यालयात विवाह झाला. लग्नात सर्व मानमाप देण्यात आले़ लग्नानंतर काही दिवसांनी ते खरेदी करण्यासाठी मॉलला गेल्यावर तेथे बिल त्यांनाच देण्यास लावले. एक महिन्यांनी चिखली येथे त्यांनी भाड्याने घर घेतले. त्याचे डिपॉझिट देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले. तिचे सासरे व पती हे वेगवेगळी करणे सांगून तिच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरुपात अडीच लाख रुपये मागून घेतले. त्यातील काही पैसे तिच्या नणंद सोनाली शिंदे हिस तिच्या घराला रंग देण्यासाठी व नंणदेच्या सासुचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी तिला दिले.
फिर्यादी यांनी पैसे दिले नाही तर घरातील सासु, सासरे व पती तिच्याशी अचानकपणे बोलणे बंद करायचे. सुबोध याने तिला पत्नीचा दर्जा न देता तु माझ्यासाठी फक्त एटीएम मशीन आहे, असे नेहमी म्हणायचा. तसेच सुबोध हे तु पैसे दिले नाही तर मी तुला फुकट सांभाळायचे का?, असे म्हणून आपण वेगळे होऊ अशी धमकी द्यायचा. फिर्यादी यांना वडिल व भाऊ नसल्याने त्या लग्नानंतरही आईच्या घराचे भाडे देत असे. त्यावरुन तु आईच्या घराचे भाडे देणे बंद कर, असे सासरे म्हणत. ते रात्रीच्या वेळी दारु पिऊन फोन करुन पैसे पाठवायला लावायचे. तिने पैसे दिले नाही तर शिवीगाळ करायचे. श्रावणात सासुने तिच्या आईकडून सोन्याचे कानातले जबरदस्तीने मागून घेतले. त्यानंतर सासुने तिचे सर्व स्त्रीधन काढून स्वत:कडे घेतले. या मानसिक त्रासामुळे त्यांचा ऑफिसच्या कामावर परिणाम होऊ लागला. त्यानंतर तिच्या घरातील लोक तू घरातूनच काम कर, असे पण तुझ्या ये जा करण्यासाठी पैसे खर्च होतात, असे म्हणत.
तिची सासु दर महिन्याचा पगार विचारत असे. तसेच त्यांनी तिच्या पीएफ अकाऊंटमध्ये किती पैसे हे मला दाखव, असा तगादा लावून त्या पीएफ मधून पैसे काढून आम्हाला दे, असे म्हणून मानसिक छळ करु लागल्या. या ताणामुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. तेव्हा ते पहायला सुद्धा आले नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये सुबोध याने मारहाण केल्याने त्या माहेरी येऊन राहू लागल्या. त्यानंतरही पती सुबोध व सासु सासरे हे अचानक घरी येऊन भांडण करत असत. शेवटी तिने फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करीत आहे.
