Wagholi Pune Crime News | (वाघोली) पुणे : अनैतिक संबंधावरुन रिक्षाचालकाचा खून; पोलिसांकडून 8 जणांना अटक

Wagholi Pune Crime News | (Wagholi) Pune: Rickshaw driver murdered over immoral relationship; 8 people arrested by police

पुणे : Wagholi Pune Crime News |  अनैतिक संबंधाच्या कारणावरुन रिक्षाचालकाला कारने धडक देऊन खाली पाडून लोखंडी पाईपाने डोक्यात मारहाण करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघोली पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.

नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे खुन झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. नामदेव बाळासाहेब आळनुरे Namdev Balasaheb Alanure (वय २९, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), कैलास सुधाकर होरे Kailas Sudhakar Hore (वय ३२, रा. चौधरी वस्ती, खराडी), बालाजी सोनाजी घनवटे Balaji Sonaji Ghanwate (वय २२, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), अनिल सोपान घनवटे Anil Sopan Ghanwate (वय २९, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली), नितीन लक्ष्मण उमाप Nitin Laxman Umap (वय २१, रा. काळुबाईनगर, वाघोली), रोहन रामचंद्र वाघमारे Rohan Ramchandra Waghmare (वय २२, रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ, येरवडा), अर्जुन ज्ञानेश्वर शेलार Arjun Dnyaneshwar Shelar (वय २०, रा. पूर्वरंगनगर, भावडी रोड, वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना वाघोली येथील बाजारतळ मैदान येथे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ सोन्नर हा रिक्षाचालक आहे. त्याचे आरोपीपैकी एकाच्या नातेसंबंधातील महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यांनी नवनाथ सोन्नर याला अनेकदा बजावून सांगितले होते की तिच्याबरोबरील संबंध सोडून दे. असे असतानाही त्याने त्यांचे म्हणणे ऐकले नव्हते. या संबंधाचा राग मनात धरुन त्यांनी नवनाथ याला बाजारतळ मैदानावर बोलावले होते. नवनाथ बाजारतळ येथील मैदानात आल्याचे त्यांनी पाहिले. तो जसा कारच्या जवळ आला. तशी त्यांनी स्वीफ्ट कारने त्याला जोरात धडक देऊन खाली पाडले. त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी पाईपने डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला. याची माहिती मिळताच वाघोली पोलीस तातडीने बाजारतळ मैदानावर गेले. त्यांनी सर्वांना पकडून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले तपास करीत आहेत.

You may have missed