Pune News | मनीषा राजेंद्र खेडेकर यांचे लक्ष्मीबाई दगडुशेठ दत्त मंदिराचे विश्वस्तपद रद्द करण्याची मागणी

Pune News | Demand to revoke Manisha Rajendra Khedekar's trusteeship of the Laxmibai Dagdusheth Datta Mandir.

पुणे : Pune News |  मनीषा राजेंद्र खेडेकर यांनी त्यांचे पती राजेंद्र बबन खेडेकर व इतरांशी संगनमत करुन पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावतो, असे सांगून मनपाचे बनावट कागदपत्रे आणि शिक्के तयार करुन बनावट नियुक्ती आदेश देऊन अनेक तरुण तरुणींकडून कोट्यावधी रुपये उकळून फसवणूक केली आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडुशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून मनीषा खेडेकर यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रमुख धार्मिक ट्रस्टच्या विश्वस्तपदी असताना नैतिक गालबोट लावणारी गुन्हेगारी कृती करणार्‍या मनीषा राजेंद्र खेडेकर यांचे विश्वस्तपद तातडीने रद्द करण्यात यावे, अशी ठाम लेखी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा रोहिदास निंबाळकर व माजी पोलिस अधिकारी असलेल्या नंदा संतोष पंडित यांनी पुणे विभागाचे सह धमार्दाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचेकडे केली आहे.

या फसवणुकीबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच मनीषा राजेंद्र खेडेकर आणि त्यांचे पती डॉ़ राजेंद्र बबन खेडेकर यांच्याविरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. ४ येथे फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे़ राजेंद्र खेडेकर हे जेजुरी देवस्थान संस्थानवर विश्वस्त आहेत. पुण्यातील प्रख्यात श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून मनीषा खेडेकर यांची सहाय्यक धमार्दाय आयुक्त प्रथमेश भोसले यांनी नियुक्ती केली होती. या संशयास्पद नियुक्ती प्रक्रिये विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात चार रिट याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मनीषा खेडेकर यांची विश्वस्तपदी झालेली नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

You may have missed