Shri Mahalaxmi Mandir Sarasbag | नवरात्रोत्सव : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात अपंग, दिव्यांगांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था

Shri Mahalaxmi Mandir Sarasbag

पुणे : Shri Mahalaxmi Mandir Sarasbag | सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ११ ऑक्टोंबरपासून सार्वजनिक नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची दररोज गर्दी असते. हे लक्षात घेऊन अपंग, दिव्यांग यांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, त्यांना अडचण येऊ नये, यासाठी मंदिर व्यवस्थापनाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DeKBzQyMznE

मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी असते. अशात शारीरीकदृष्ट्या ज्यांना रांगेत उभे राहणे शक्य नसते. अशा दिव्यांग, अपंग व्यक्तींना देवीचे दर्शन सहज शक्य व्हावे, यासाठी दररोज दुपारी ४ ते ५ या वेळेत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी येथे व्हिलचेअर, स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ते या व्यक्तींना देवी दर्शन घेण्यास मदत करणार आहे.

https://www.instagram.com/p/DeJzbebMXTI

उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती भरत अग्रवाल यांनी सांगितले की,  पुणे महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक दिव्यांग मुलांनी अतिशय वेधक चित्रे काढली आहेत. त्यापैकी काही निवडक चित्रांचे प्रदर्शन ११ व १२ ऑक्टोंबर २०२६ रोजी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ १६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी सांगितले की, गणेशोत्सवात विघ्नहर्ता न्यासामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिके दिली जातात. त्याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यात मंडळाचा देखावा, वर्षभर केले जाणारे काम लक्षात घेऊन उत्कृष्ट मंडळाची निवड करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये, ११ हजार रुपये आणि ५ हजार रुपये बक्षीस तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत.

मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रविण चोरबेले यांनी सांगितले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही पोलिसांकडून मदत मागितली आहे. पाटील प्लाझा येथे पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आणखी कोठे व्यवस्था करता येईल, याची पहाणी करत आहे.

You may have missed