Pune Crime News | घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीच्या पूर्वीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा मित्राबरोबरील फोटो अपलोड करुन बदनामी केल्याच्या आरोपावरुन पूर्वश्रमीच्या पतीवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर महिलेच्या जुन्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिचा मित्राबरोबर एकत्र असलेला वैयक्तिक फोटो अपलोड करुन महिलेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी पूर्वश्रमीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित उदय देशमुख Abhijit Uday Deshmukh (रा. थेऊर) असे गुन्हा दाखल झालेल्या पूर्वश्रमीच्या पतीचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ ऑगस्ट ते १२ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा २०२३ मध्ये अभिजित देशमुख यांच्याबरोबर विवाह  झाला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये कौटुंबिक कारणास्तव वाद होत होते. त्यामुळे त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतला. १७ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या भावाला कळविले की, फिर्यादी यांचा व त्यांच्या मित्राचा फोटोचा वापर करुन फेसबुकवर महिलेच्या फेसबुक प्रोफाईलला ठेवला आहे. महिलेने फेसबुक चेक केल. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे जुने फेसबुक अकाऊंट आहे. ते त्यांनी लग्नापूर्वी बनविले होते.

परंतु, त्याचा घटस्फोट झाल्यापासून त्या वापर करत नव्हते. परंतु, त्यांचे पती अभिजित देशमुख यांच्याकडे त्याचा पासवर्ड होता. तेव्हा फिर्यादी यांच्या लक्षात आले की, त्याचा गैरवापर करुन त्याने फिर्यादी व त्यांच्या मित्राचा सोबत असलेला जुना कॉलेजमधील फोटो फेसबुक प्रोफाईलला ठेवून व्हायरल केला असून बदनामी केली आहे. सायबर सेलने केलेल्या चौकशीमध्ये आयपीडीआर सीडीआर मध्ये तीन मोबाईल नंबर  मिळून आले. हे मोबाईल उदय देशमुख तसेच अभिजित देशमुख व आशिष दलवाई हे वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

You may have missed