Manjari Pune Crime News | सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरी प्रकरणात मांजरी पोलिसांनी दिल्लीतून केले एकाला अटक, 31 लाखांचे 13 किलो चांदीचे दागिने जप्त

Manjari Pune Crime News | In a case of theft by making a hole in the wall of a jewellery shop, Manjari police arrested one person from Delhi, seized 13 kg of silver jewelry worth 31 lakh.

पुणे : Manjari Pune Crime News |  मुंढवा येथील आराध्या ज्वेलर्स या सराफी पेढीतील भिंतीला छिद्र पाडून अडीच कोटी रुपयांचे सोने चांदीचे  दागिने चोरुन पसार झालेल्या चोरट्यांच्या साथीदाराला मांजरी पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीकडून ३१ लाख रुपयांची १३ किलो ७९२ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

कासीम मोहसीन शेख Kasim Mohsin Shaikh (वय ४१, रा. कुंचा सेठ, दरीबा कलान, चांदणी चौक, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मांजरी-मुंढवा रस्त्यावरील अ‍ॅव्हेन्यू कॉम्प्लेक्स या इमारतीतील तळमजल्यावरील सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून २ कोटी ५६ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना जुलै २०२६ मध्ये घडली. या सोसायटीतील रखवालदाराच्या खोलीतून  सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील २ कोटी ५५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोकड असा ऐवज चोरुन नेला होता.  

या प्रकरणी मांजरी पोलीस ठाणे, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ४ चोरट्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण १३ आरोपी आहेत. पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून एका चोरट्याचे लोकेशन दिल्लीतील चांदणी चौक परिसरात दिसून आले. मांजरी पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. त्यांनी कासिम शेख याला अटक केली. आरोपी कासीम शेख हा चोरट्यांचा नातेवाईक आहे. कासीम हा दिल्लीतील चांदणी चौक परिसरात दागिने घडविण्याचे काम करतो. सराफी पेढीत चोरी केल्यानंतर कासीमचा नातेवाईक हा दिल्लीत आला. त्याने कासीमला १३ किलो चांदीचे दागिने ठेवण्यास दिले. कासीमने १३ किलो चांदीच्या दागिन्यांची एकाला विक्री केली. त्याच्याकडून १३ किलो ७९२ ग्रॅमचे ३१ लाख रुपयांचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, पोलीस निरीक्षक इरफान नदाफ, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, गणेश काकडे, प्रकाश बेरड, अशोक अंधारे, रवीकांत कचरे, चंद्रकांत रेजितवाड, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव, हिरवे, अश्पाक शेख, वैभव ओहोळ, अमोल जाधव यांनी केली आहे.

You may have missed