Satara Accident News | साताऱ्यात दुर्दैवी घटना! नुकतेच लग्न ठरलेल्या 32 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Satara Accident News | Tragic incident in Satara! 32-year-old man, recently engaged, dies in an accident; a mountain of grief on the family

सातारा : Satara Accident News | सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ३२ वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओंकार ज्ञानेश्वर फडतरे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. नुकतेच त्याचे लग्न ठरले होते. मात्र, संसाराची स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ओंकार दुचाकीवरून येत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

ओंकारचा स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय होता. याशिवाय तो जरंडेश्वर साखर कारखान्यातही काम करत होता. मेहनती आणि कष्टाळू असलेल्या ओंकारचे नुकतेच लग्न ठरले होते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले.

ओंकारच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण आणि चुलते असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

You may have missed