Pune Crime News | खासगी शिकवणीमध्ये 12 वर्षाच्या विद्यार्थ्याबरोबर अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | खासगी शिकवणीचालकाने १२ वर्षाच्या मुलाशी अश्लिल कृत्य करुन त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. खडक पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दत्ता लांडगे (रा. जय को ऑपरेटिव्ह सोसायटी, घोरपडी पेठ) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अश्लील कृत्य करणे, तसेच मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाच्या आईने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै ते १९ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खासगी शिकवणी वर्ग चालवितो. घोरपडे पेठेतील त्याच्या घरी तो मुलांची शिकवणी घेतो. फिर्यादी महिलेचा १२ वर्षीय मुलगा त्याच्याकडे शिकवणीसाठी जातो. आरोपीने मुलाला बेडरुममध्ये नेले. त्याला पुस्तक वाचण्यास सांगितले. शिकवण्याच्या बहाण्याने त्याने मुलाशी अश्लील कृत्य केले. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला मारहाण केली. त्याला शिकवणी वर्गातून जाण्यास सांंगितले. जुलै महिन्यापासून आरोपी मुलाशी अश्लील कृत्य करत होता. मुलाने याबाबत नुकतीच आईला माहिती दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.
महत्त्वाची संपादकीय टीप : सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.
