Pune Crime News | जागा विकलेली असतानाही बॅक डेटेड बनावट दस्त बनवुन फसवणूक केल्याचा आरोपावरुन रामदास सायकर यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल, नोटरी, स्टॅम्पव्हेंडर , साक्षीदारांच्या बनावट सह्या, नोंदणी केल्याचे उघड
पुणे : Pune Crime News | बाणेर येथील मिळकत नोंदणीकृत दस्ताने मिळकत विकली असताना तिचे बॅक डेटेड दस्त बनवून तसेच ते खरे असल्याचे भासवुन त्याचा पुरावा म्हणून वापर करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन रामदास सायकर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत स्नेहल संजय पिंपरकर (वय ५६, रा. साकेत सोसायटी, डी पी रोड, औंध) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रामदास हनुमंत सायकर Ramdas Hanumant Saykar (वय ५७), शकुंतला हनुमंत सायकर Shakuntala Hanumant Saykar (वय ७६), रंजना हनुमंत सायकर Ranjana Hanumant Saykar (वय ७४), छाया सुनिल रासकर Chhaya Sunil Raskar (वय ५६,तिघी रा. करंदी, ता. शिरुर), योगेश पोपटराव कळमकर Yogesh Popatrao Kalmakar , जीवन पोपटराव कळमकर Jeevan Popatrao Kalmakar (रा. बाणेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर येथील मिळकतीमध्ये २०२१ पासून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी रामदास सायकर व इतरांकडून नोंदणीकृत दस्ताने ठरल्याप्रमाणे संपूर्ण मोबदला देऊन मालकी हक्कासह व ताब्यासहीत विकत घेतली. त्याचे अ, ब, क मिळकतीचे खरेदीखत हे दुय्यम निबंधक कार्यालयात ड मिळकतीचे खरेदीखत हे ३ नोव्हेबर २०२० रोजी लिहून व नोंदवुन ठेवण्यात आलेले आहे. या मिळकतीमध्ये फिर्यादी यांनी त्यांचे मालकी हक्क प्रस्तापित केलेले आहेत. आरोपी यांनी एका प्रकरणात दोन बनावट दस्त म्हणजेच एका स्टॅम्प पेपवर करारनामा नावाचा तर दुसर्या स्टॅम्प पेपरवर कुलमुखत्यारपत्र नावाचा १४ सप्टेंबर २००१ रोजी बनावट दस्त समोर आणले आहे. हे दोन्ही बनावट दस्ताचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सर्व आरोपी यांनी यापूर्वीच फिर्यादी यांना विकलेली मिळकत गिळंकृत करण्याचे उद्देशाने फिर्यादी यांची घोर फसवणूक केलेली आहे. आरोपींनी कट रचून १०० रुपयांचे खोटे दोन बनावट स्टॅम्प तयार केले. तसेच या स्टॅम्पपेपरवर कोणताही तपशील न भरता तो तसाच मोकळा सोडून हे स्टॅम्प कल्पना कदम स्टॅम्प व्हेंडर यांच्याकडून घेतल्याचे भासविले आहे. तसेच त्यातील एका स्टॅम्प पेपरवर करारनामा नावाचा तर, दुसर्या स्टॅम्प पेपरवर कुलमुखत्यारपत्र नावाचा १४ सप्टेंबर २००१ रोजीचा बनावट दस्त बनवला आहे. दोन्ही दस्त नोटरी सतीश कुमार तिवारी यांच्याकडे नोटरी रजिस्टर केल्याचे दाखविले आहे. साक्षीदारांच्या सह्या बनावट केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माहिती अधिकारात अर्ज देऊन विधी विभागाकडून माहिती मागविली होती. त्यात विधी व न्याय विभागाने माहिती दिली की, नोटरी सतीशकुमार तिवारी यांचे नाव १२ एप्रिल १९९६ रोजी महाराष्ट शासन राजपत्रावर नोटरीचे नाव नोटरी रजिस्टरमधून काढून टाकण्यात आले आहे. स्टॅम्प व्हेंडर कल्पना कदम यांनी कोणतेही स्टॅम्प पेपर आरोपी यांना विक्री केलेले नसल्याचे दुय्यम निबंधक यांच्याकडील माहिती अधिकारात समोर आले आहे. या मुद्रांकाचे प्रतीवर विक्रेता म्हणून असलेला शिक्का व सही कल्पना कदम यांची नसल्याबाबत त्यांनी कळविले आहे. दस्तावर असलेले साक्षीदार गणेश काटे यांच्याकडे या दस्ताबाबत चौकशी केली असता त्यांचे देखील परस्पर हे दस्त बनवल्याचे माहिती समजली आहे. सर्व आरोपींनी एकत्रित मिळून संगनमताने गुन्हा करण्याचे, हेतूने या मिळकतीमध्ये कोणताही हक्क व अधिकार नाही, याची स्पष्ट जाणीव असताना फिर्यादी यांना संपूर्ण मोबदला स्वीकारुन मालकी हक्काने विकलेल्या मिळकतीचे बॅक डेटेड बनावट दस्त बनवले. तसेच ते खरे असल्याचे भासवून त्याचा पुरावा म्हणून वापर करुन फसवणुक केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.
महत्त्वाची संपादकीय टीप : सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.
