Pune Crime News | फटाके बाजूला उडवा सांगितल्याच्या रागातून टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यु, टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल, विमानतळ पोलिसांनी चौघांना केली अटक

Pune Crime News | Young man dies in beating by a group over anger at being told to put away fireworks, murder case filed against the group, airport police arrest four

पुणे : Pune Crime News | फटाका अंगावर उडल्याने बाजूला फटाके उडवा, असे सांगितल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी बांबुने मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. विमानतळ पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. उपचार सुरु असताना गुरुवारी दुपारी या तरुणाचा मृत्यु झाला आहे. विमानतळ पोलिसांनी गुन्ह्यामध्ये खुनाचे कलम वाढ केली आहे.

अमन समीर शेख (वय २२, रा. कलवड वस्ती, लोहगाव रोड, लोहगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्याचे वडील समीर अब्दुल शेख (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राम नागनाथ नवले Ram Nagnath Navle (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), सम्यक संदीप साळवी Samyak Sandeep Salvi  (वय १८, रा. चौधरीनगर, टिंगरेनगर), तेजस उमाकांत शिंदे Tejas Umakant Shinde (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) आणि आदित्य सिद्धेश्वर गायकवाड Aditya Siddheshwar Gaikwad (वय १८, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील कायरा रोड येथील रोझ गार्डन सोसायटीसमोर ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमन व अयान, अरमान शेख व त्याचे काही मित्र हे रोझ गार्डन सोसायटी समोर फटाके वाजवण्यासाठी थांबलेले होते. पुढे थोड्या अंतरावर ४ मुले फटाके वाजवत होती. ते फटाके यांच्या अंगावर उडाल्याने अमन शेख याने फटाके जरा बाजुला वाजवा, असे सांगितले. त्यावर ती मुले त्यांच्याजवळ येऊन तुम्ही इथून निघून जावा, तुमचे घर इथे आहे का, असे बोलून वाईट वाईट शिवीगाळ करु लागले. तेव्हा अमन याने तुम्ही शिवीगाळ करु नका, असे बोलला. तेव्हा त्यांनी अमन याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेथे रस्त्याचे कडेला पडलेल्या लाकडी बांबुने अमन याच्या डोक्यात, पाठीवर, हातावर, तोंडाला मारून गंभीर जखमी केले. इतर जण भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी धक्काबुक्की करुन शिवीगाळ करुन तेथून पळून गेले. अमन याला मित्रांनी प्रथम सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सुरुवातीला विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

अमन शेख याला गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. उपचार सुरु असताना गुरुवारी दुपारी त्याचा मृत्यु झाला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी सांगितले की, ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे अंधार असून जवळपास सीसीटीव्ही नाहीत. या प्रकरणात चौघांना अटक केली असून या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढ केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

You may have missed