Haj 2027 Agreement | 2027 मध्ये पावणे दोन लाख भारतीय करु शकणार हज यात्रा ! भारत, सौदी अरेबियामध्ये द्विपक्षीय हज करारावर जेद्दाह येथे स्वाक्षरी

Haj 2027 Agreement | India and Saudi Arabia sign Haj 2027 agreement, India's quota set at 175,025 pilgrims

मुंबई : ( Basit shaikh) : Haj 2027 Agreement | केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक बिन फवझान अल रबिया यांनी जेद्दाह येथे हज २०२७ साठी द्विपक्षीय हज करारावर  स्वाक्षरी केली. या करारानुसार १ लाख ७५ हजार २५ भारतीय २०२७ च्या हज  यात्रा करु शकणार आहेत. भारतीय  वाणिज्य दुतावासाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

किरेन रिजिजू आणि तौफिक बिन फवझान अल रबिया या दोन्ही मंत्र्यांनी हज २०२७ च्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत तयारीबरोबरच प्रमुख
परिचालन प्राधान्यावर चर्चा करण्यात आली. भारतीय हज यात्रेकरुंना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास अनुभवता यावा, यासाठी निवास, वाहतूक आणि वैद्यकीय सुविधांबबत दोन्ही देशांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

भारताचा हा १ लाख ७५ हजार २५ यात्रेकरुंचा कोटा २०२५ आणि २०२६ प्रमाणे २०२७ साठीही कायम ठेवण्यात आला आहे. २०२४ मध्ये हा कोटा १ लाख ३६ हजार २० इतका होता.

किरेन रिजिजू यांनी जेद्दाह येथे झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय हज परिषदेत सहभाग घेतला. तसेच त्यांनी भारतीय हज समिती आणि भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकार्‍यांसोबत हज २०२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी भारताचे कौन्सुलेट जनरल जेद्दाह फहाद सुरी आणि हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहनवाझ सी उपस्थित होते.

You may have missed