Pune Crime News | फायनान्स कंपनीचे संचालक करण्याची बतावणी करुन 25 लाखांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन स्मित फायनान्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फायनान्स कंपनीत ठेव ठेवल्यास मुलाला संचालक बनवतो, असे आमिष दाखवून २५ लाख रुपये घेऊन कोणताही परतावा न देता मुलाला संचालक न करता फसवणुक करण्यात आली आहे. स्मित फायनान्सियल अँड इन्व्हेस्टमेंटच्या दोघा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एरंडवणे येथील एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राम रामचंद्र भाटले/मटाले (रा. पाम बिल्डिंग, प्राणजी गार्डन, बदलापूर) आणि रोशनी झुनझुनवाला या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मित फायनान्सियल अँड इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे संचालक राम भाटले, रोशनी झुनझुनवाला यांनी फिर्यादीच्या मुलास कंपनीमध्ये संचालक बनवतो, तसेच फिर्यादी यांनी कंपनीत ठेवलेल्या ठेवीवर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन परतावा देतो, असे आमिष दाखवले. फिर्यादी व त्यांच्या मुलाने कंपनीत २५ लाख रुपयांची ठेव ठेवली.  त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या मुलाला संचालक बनविले नाही. तसेच त्यांच्या २५ लाख रुपयांवर कोणताही परतावा दिला नाही. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत़.

You may have missed