Pune PMC News | ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डाचे प्रदेशाध्यक्ष सनी निम्हण यांच्या तक्रारीनंतर महापालिकेचा बिल्डरला दणका ! विना परवाना रस्ता खोदल्याप्रकरणी ग्रोस्टोन  व्हेंचर्सला तीन पट दंडाची नोटीस

Pune PMC News | After a complaint by Sunny Nimhan, the state president of the All India Anti-Corruption Board, the municipal corporation hits the builder! Growstone Ventures gets a notice for triple the fine for digging a road without a permit

पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाची कोणतीही परवानगी न घेता वीज पुरवठयासाठी केबल टाकण्यासाठी रस्ता खोदल्याप्रकरणी ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डाचे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण (Sunny Laxman Nimhan) यांच्या तक्रारीची दखल घेवुन महापालिकेने संबंधित काम थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर विना परवाना रस्ता खोदल्याप्रकरणी ग्रोस्टोन  व्हेंचर्स   (Growstone Ventures) यांना २८ लाख ८९ हजार ५०४ रुपये इतक्या (तीन पट) दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे.

पुण्यातील भांबुर्डा परिसरात महावितरणची (एमएसईडीसीएल) केबल टाकण्यासाठी परवानगी न घेता खोदकाम करण्यात आले होते. दरम्यान, ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण यांनी महापालिकेच्या पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी तक्रार दिली होती. भांबुर्डा परिसरात ग्रोस्टोन व्हेन्चर्सकडून ८० ते ९० मीटर लांबीचे खोदकाम करून महावितरणची केबल टाकण्यात येत असल्याचे निम्हण यांनी तक्रारीत म्हटले होते. 

या तक्रारीची महापालिकेने दखल घेवुन महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र देवुन ग्रोस्टोन  व्हेंचर्स  या विकासकाने परवानगी न घेता विद़युत केबल टाकण्यासाठी ७९ मीटर लांबीचा डांबरी रस्ता तोडण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. रस्ता खोदाई परवानगी न घेता विदयुत केबल टाकण्याचे काम करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे  हे गंभीर व आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे विना परवाना टाकण्यात आलेल्या विद्युत केबलद्वारे संबंधित विकासकाला वीज जोडणीसाठी लोड मंजूर करुन विदयुत जोडणी देण्यात येवु नये, असे महापालिकेच्या कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

तसेच महापालिकेच्या पथ विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन ७९ मीटर लांबीचा डांबरी रस्ता तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने प्रति मीटर १२ हजार १९२ रुपये दराने एक पट दंड म्हणून ९ लाख ६३ हजार १६८ रुपयांचा दंड निश्चित केला. विना परवानगी काम केल्याने या दंडाच्या तीन पट म्हणजे २८ लाख ८९ हजार ५०४ रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. ग्रोस्टोन व्हेंचर्स या विकासकाने दंडाची संपूर्ण रक्कम महापालिकेच्या कोषागारात जमा केल्यानंतर हे बांधकाम पुन्हा सुरु करण्याबाबत पथ विभागामार्फत स्वतंत्रपणे लेखी कळविण्यात येईल, असे पथ विभागाने बांधकाम विकास विभागाला कळविले आहे.

You may have missed