India Haj Qurrah 2025 | पावणे दोन लाख भाविक पुढील वर्षी जाणार ‘हज’ला ! केंद्र सरकारकडून कोटा जाहीर, महाराष्ट्रासाठी 17 हजार 412

पुणे : (बासित शेख) : India Haj Qurrah 2025 | पुढील वर्षी हज येथे होणार्या यात्रेसाठी केंद्र सरकारने कोटा जाहीर केला असून १ लाख ७५ हजार २५ भाविकांना हजला जाण्याची संधी मिळणार आहे. त्यातील ७० टक्के कोटा म्हणजेच १ लाख २२ हजार ५१८ भाविकांना केंद्र सरकारच्या हज कमिटीमार्फत जाता येणार आहे. त्यामध्ये ५०० महिलांचा (मेहराम कोटा) समावेश आहे.
केंद्र सरकारने हज यात्रेसाठी जाणार्या भाविकांसाठी कोटा निश्चित करण्यापासून त्यांची निवड करणे, त्यासाठी भरावे लागणारे भाडे याची सर्व माहिती ऑनलाईन केली आहे. त्यामुळे आता या सर्व बाबी पारदर्शक झाल्या असल्याचे खुद्दम- ए- हुज्जाज पुणे शहर व जिल्हा हज कमेटीचे अध्यक्ष हाजी रियाज काझी, सचिव हाजी सय्यद खान यांनी सांगितले.
हज यात्रेची घोषणा १३ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आली. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ होती. आतापर्यंत १ लाख ५२ हजार ९७६ अर्ज करण्यात आले आहेत. त्यात ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांची संख्या १४ हजार ७२८ इतकी आहे. मेहरम शिवाय जाऊ इच्छिणार्या महिलांची संख्या ३ हजार ७१७ इतकी आहे.
महाराष्ट्रासाठी यंदा १७ हजार ४१२ इतका कोटा जाहीर करण्यात आला असला तरी त्या पेक्षा अधिक २३ हजार ३९५ अर्ज आले आहेत. ५ हजार ९८३ अर्ज प्रलंबित आहेत. पुणे जिल्ह्यातून १४४२ हज यात्रे करू जाणार आहेत.
हज यात्रेसाठी जाणार्यांनी पहिला हप्ता स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये १ लाख ३० हजार ३०० रुपये ८ ते २१ ऑक्टोंबर दरम्यान भरायचा आहे.
हजला जाणार्यांसाठी नेहमीप्रमाणे पेन्शनवाला मस्जिद नाना पेठ येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हज २०२५ ला पुणे जिल्ह्यातून १४४२ यात्रिक हजला जाणार आहे असे खुद्दम- ए – हूज्जाज हज कमेटिचे अध्यक्ष हाजी रियाज काझी यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’