Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’, अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

मुंबई : Nana Patole On Amit Shah | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी रणनीती आखत तयारी सुरु केली आहे. लोकसभेत भाजपला मोठा फटका सहन करावा लागला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी (BJP Sr Leader) राज्यात विशेष लक्ष दिले आहे.
https://www.instagram.com/p/DAnNN90Cpnz
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत. दरम्यान मुंबईत कार्यकर्त्यांची बोलताना त्यांनी यंदा युतीचे सरकार येईल मात्र २०२९ ला भाजप स्वबळावर सरकार बनवेल, असे विधान केले आहे. तर २०२४ मध्ये ते जिंकू शकत नाहीत हे अमित शहा यांनी मान्य केल्याची टीका काँग्रेसने (Maharashtra Congress) केली आहे.
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
“लोकसभा निवडणूक आपण तिसऱ्यांदा जिंकली. काँग्रेस शंभरचा आकडाही गाठू शकली नाही, मग तरीही तुम्ही निराश का राहता? नैराश्य गाडून टाका. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलेल. मला दिल्लीत विचारतात की महाराष्ट्रात काय होणार? मी आताही सांगतो, आपलीच सत्ता येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता आपल्याला महायुतीचेच सरकार आणायचे आहे, २०२९ मध्ये पूर्णपणे कमळाचे सरकार असेल,” असे अमित शहा म्हणाले.
https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K
“२०२९ साठी अजून वेळ आहे. पण २०२४ मध्ये ते जिंकू शकत नाही हे त्यांनी मान्य केले आहे.
महाराष्ट्रात जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होईल तेव्हा सत्तेत बसलेल्यांना लोक रस्त्यावरही फिरु देणार नाहीत अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून त्यांच्याजवळ त्यासंदर्भातील रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केले असेल,” असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
https://www.instagram.com/p/DAm9yjtJQBK
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Rohit Pawar | ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले…’ सुप्रिया सुळेंचे वक्तव्य चर्चेत;
म्हणाल्या – ‘शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर…’