Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे
चिंचवड : Chinchwad Assembly Constituency | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) चर्चा सुरु आहेत. पुढील काही दिवसात उमेदवारांची यादी घोषित होईल असे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात भाजपची अंतर्गत गटबाजी (BJP’s Internal Factionalism) पुन्हा समोर आली आहे.
https://www.instagram.com/p/DAlaH6FpAV4
विधानसभेत उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी भाजपने बोलावलेल्या बैठकीला इच्छुकांनाच डावलल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या नावाला विराेध हाेऊ नये, यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी पक्ष निरीक्षकांच्या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचा आरोप इच्छुकांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DAldwGhpRx7
चिंचवड विधानसभा मतदार संघातील संघटनेचे आणि शहरातील प्रदेशवर कार्यकारिणीवर असलेल्या पदाधिकारी यांना बैठकीचे निमंत्रण देणे अपेक्षित हाेते. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक शीतल शिंदे (Sheetal Shinde), चंद्रकांत नखाते (Chandrakant Nakhate), शत्रुघ्न काटे (Shatrughan Kate) यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.
https://www.instagram.com/p/DAlcjLRp3CR
चिंचवड विधानसभा मतदार संघात उमेदवार काेण पाहिजे, याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काळेवाडीत मंगळवारी भाजपचे प्रभारी नेते प्रदीपसिंग जडेजा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी बैठकीसाठी निरीक्षक म्हणून पुण्याचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून संघटनेचा शहर सरचिटणीस आहे. माजी नगरसेवक असतानाही बैठकीचे निमंत्रण दिले नव्हते. याबाबत निरीक्षकांकडे तक्रार केली असल्याचे माजी नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
तर, भाजप शहराध्यक्ष मनमानी कारभार करत असून पक्ष त्यांचा घरचा असल्यासारखा चालवत आहेत. त्यांच्या जवळच्या लाेकांना बाेलावून स्वतःचे नाव लिहून घेतले आहे. याबाबत प्रदेशच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे प्रदेश सदस्य चंद्रकांत नखाते यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DAnNN90Cpnz
दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून तीन इच्छुकांची बंद लिफाफ्यात नावे देण्यात आली आहेत.
त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप आणि
तिसऱ्या क्रमांकावर विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे (Kaluram Barne) यांचे नावे दिल्याची माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAnGnT_CcXV
उमेदवारीसाठी भाजपमध्ये माेठी रस्सीखेच सुरू आहे. आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि शंकर जगताप
या दीर भावजयमध्ये उमेदवारीसाठी गृहकलह निर्माण झाला आहे.
त्यातच माजी नगरसेवकांनी जगताप कुटुंबाला विराेध करत उमेदवारीवर दावेदारी सांगितली.
त्यामुळे भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. (Chinchwad Assembly Constituency)
https://www.instagram.com/p/DAm9yjtJQBK
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा