Jayant Patil On Mahayuti Govt | मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावरून जयंत पाटलांचा महायुती सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ” बुडत्याला काडीचा आधार…”
मुंबई: Jayant Patil On Mahayuti Govt | काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही नवी महामंडळे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9
पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्रे विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. गोरा कुंभार, कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवला आहे. तसेच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा ८ लाखावरुन वाढवून आता १५ लाखांची करण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान आता जयंत पाटील यांनी ट्वीट करत काही मिनिटांत घेतलेले हे निर्णय सरकारची अगतिकता दाखवत असल्याचा टोला लगावला आहे.
https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ
जयंत पाटील म्हणाले,”येत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो. म्हणूनच ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकुट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/DA-TMdSpIXJ/
पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्याने मनाला वाट्टेल त्या घोषणा करुन आश्वासने देत आहे. गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांतील विशेषतः कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अवघ्या काही मिनिटांत घेतले गेलेले निर्णय त्रिकुट सरकारची अगतिकता दर्शवत आहे”, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/DA-YcD5pjsm
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण