Maharashtra Assembly Election 2024 | ‘लोकसभेची पुनरावृत्ती नको, निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये’, ‘आरएसएस’ कडून भाजपला सूचना

Devendra Fadnavis-Mohan Bhagwat

नागपूर : Maharashtra Assembly Election 2024 | मागील दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वात आधी शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt) कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार (Mahayuti Govt) स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं.

https://www.instagram.com/p/DA-YcD5pjsm

त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसंच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. दरम्यान सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

https://www.instagram.com/p/DA-WtrGiyn1/?img_index=1

लोकसभेला फटका बसल्यानंतर आता या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही (Rashtriya Swayamsevak Sangh-RSS) भाजपला प्रचारादरम्यान मदत करणार असल्याची माहिती आहे. कालच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरएसएसने भाजपला (BJP) महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DA-TMdSpIXJ

निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये. भाजपच्या जुन्या कॅडरच्या कार्यकर्त्यांकडं दुर्लक्ष नको, अशा सूचना नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांच्यासोबतच्या बैठकीत भाजपला देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे संगठन कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपच्या तयारी आणि नियोजनाचा आढावा घेत आहे.

https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ

लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं. म्हणजेच भाजपचा मतदार असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात मतदान करायला बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदानकेंद्रांपर्यंत नेता आलं नाही. त्यामुळे मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदानाचा टक्का वाढवा, असेही संघाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed