MVA Seat Sharing Formula | महाविकास आघाडीत जागावाटपावरून नाराजीनाट्य; पवार अन् ठाकरे नाराज? विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर काँग्रेसचा दावा

Mahavikas Aghadi-Shivsena UBT

मुंबई: MVA Seat Sharing Formula | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने आत्मविश्वास बळावला आहे. दरम्यान तिन्ही पक्षात जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. विदर्भातील ६२ जागांपैकी ४५ जागांवर काँग्रेसने (Congress) दावा केल्याने शिवसेना ठाकरे पक्ष (Shivsena Thackeray Group) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या (Sharad Pawar NCP) नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातून काँग्रेसकडे ६२ जागांसाठी ४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत.

https://www.instagram.com/p/DAkw-8RifZy

लोकसभा निवडणुकीत अमरावती, रामटेक या हक्काच्या जागा सोडल्याने विदर्भातील विधानसभेच्या जागा मिळाव्यात, असा आग्रह शिवसेना ठाकरे पक्षाने धरला आहे. तर वर्ध्याची जागा शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने जिंकल्याने त्यांनीही १० ते १२ जागांवर दावा केला आहे. दसऱ्यापूर्वी जागावाटप पूर्ण करण्याचे महविकास आघाडीने निश्चित केले आहे.

https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr

महाविकास आघाडीतील जवळपास ८० टक्के जागांवरील तिढा सुटल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र असून मुंबई व परिसरातील मतदार संघाच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने नमते न घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी विदर्भातील ६२ पैकी किमान ४५ जागा लढविण्याचा हट्ट धरला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाला विदर्भातून दुहेरी आकड्यातील जागांची अपेक्षा आहे तर, राष्ट्रवादीचीही १२ ते १५ जागांवर नजर आहे.

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

मात्र, विदर्भात हमखास यश मिळण्याची खात्री असल्याने काँग्रेस नेत्यांची जागा सोडण्याची तयारी नाही. विशेषतः, २०१९ मध्ये शिवसेनेने लढविलेल्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे आणि त्या जागा सोडण्यास त्यांची तयारी नाही. मात्र, त्यातही या जागांचा तिढा न सुटल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Rohit Pawar | ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले…’ सुप्रिया सुळेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या – ‘शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर…’

Maharashtra Politics | फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला; भाजपचे कार्यकर्ते चिंतेत

You may have missed