Pimpri Assembly Constituency | पिंपरी विधानसभेत लढण्यास इच्छुक; ‘या’ महिला नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Sharad-Pawar

पिंपरी: Pimpri Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभुमीवर शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीत मोठी इन्कमिंग सुरु आहे. महायुतीने अनेक नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झाले आहेत. समरजित घाटगे (Samarjeetsinh Ghatge), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) असे मोठे नेते पवारांच्या गळाला लागले आहेत.

https://www.instagram.com/p/DA0K2OuCPSO

क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनीही शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. महाविकास आघाडीत जागावाटपाची (MVA Seat Sharing Formula) चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मविआच्या नेत्यांनी दिली आहे.

https://www.instagram.com/p/DA0I5KDiF6X

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र शरद पवारांनी मागील काही दिवसात या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तुतारी (Tutari) हातात घेतली आहे.

https://www.instagram.com/policenamaa

तर अनेकजण राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे (Seema Savale) यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पिंपरी विधानसभेत निवडणूक लढण्यासाठी त्या इच्छुक असल्याचे बोलले जातेय.

https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa

आगामी काळात सावळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यास महायुतीला हा आणखी एक धक्का मिळू शकतो. पिंपरी विधानसभेबाबत शरद पवार काय रणनीती ठरवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/DA0EeM-i6nY

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsingh Naik Nimbalkar | रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान; म्हणाले – ‘एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरून समोरासमोर या, अपक्ष लढू’

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

You may have missed