Pune Crime News | दांडिया कार्यक्रमानंतर धनकवडी, बाणेरमध्ये मारहाणीच्या घटना; दारू पिऊन मारहाण तर, जुन्या वादातून डोक्यात घातला दगड

Pune Crime News | After the Dandiya event, incidents of beating in Dhankawadi and Baner; people beaten after drinking alcohol, and a stone thrown at someone's head due to an old dispute

पुणे : Pune Crime News | दांडिया कार्यक्रमानंतर झालेल्या वादातून बाणेर आणि धनकवडी भागात मारहाणीच्या घटना घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी सहकारनगर आणि बाणेर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

धनकवडीतील श्रीधरनगर भागात एका सोसायटीच्या आवारात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याबाबत अनिकेत मोरेश्वर तावरे (वय ३१, रा. श्रीनगर पार्वती हाईट्स, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन  प्रकाश कोकरे (रा. श्रीनगर पार्वती हाईटस, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोसायटीतील दांडिया कार्यक्रमानंतर रात्री दहाच्या सुमारास मित्रांबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी प्रकाश कोकरे हा दारू पिऊन सोसायटीत आला. त्याने सोसायटीच्या आवारात शिवीगाळ केली. अनिकेत तावरे यांना गजाने मारहाण केली, तसेच सिमेंटचा गट्टु फेकून मारून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

बालेवाडीतील साई चौकात एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत सुमीत राजू राठोड (वय २०, रा. पाटीलनगर, बालेवाडी) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण सोनवणे (रा. बालेवाडी) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री राठोड आणि त्यांची बहीण बालेवाडीतील साई चौकात दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. त्या वेळी आरोपींनी जुन्या वादातून राठोड याला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला. पोलीस हवालदार सकट तपास करत आहेत.

You may have missed