Pune Crime News | भाई न म्हटल्याने डोक्यात घातली बियरची बाटली ! टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण

Marhan

पुणे : Pune Crime News | पुलावर गप्पा मारत असताना मांड्या सुटणार असे म्हणताना त्याला भाई न म्हटल्याने गुंडाच्या साथीदारांनी तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली मारुन जखमी केले. इतर अल्पवयीन मुलांनी लोखंडी हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Attack On Youth)

https://www.instagram.com/p/DAz8W8YJ20_

याबाबत रितीकेश शितलकुमार जोगदंडे (वय २५, रा. आंबेडकर चौक, खडकी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन ऊर्फ अनिकेत अनिल गायकवाड (वय २३, रा. रेंजहिल, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नवीन झालेल्या औंध सांगवी (Aundh-Sangvi Road) नदी पुलावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DAz6HUcpoq6

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र नवीन झालेल्या औंध सांगवी नदी पुलावर रात्री गप्पा मारत बसले होते. तेव्हा फिर्यादी यांनी ओळखीच्या मुलांना मांड्या सुटणार आहे, असे बोलले. त्याचा राग येऊन रोहन गायकवाड फिर्यादीला म्हणाला की, मांड्या बोलायचे नाही, मांडा भाई असे बोलायचे असे म्हणून त्याने लगेच बियरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. एका अल्पवयीन मुलाने तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारुला. दुसर्‍या अल्पवयीन मुलाने रबरी पाईप उचलून फिर्यादीच्या पाठीवर मारला. तर तिसर्‍याने लाथाबुक्क्याने फिर्यादीच्या चेहर्‍यावर व शरीरावर मारहाण केली. चौथ्याने लोखंडी हत्याराने नडघी व पोटरीवर मारुन जखमी केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAxvcR5J8kI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsingh Naik Nimbalkar | रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान; म्हणाले – ‘एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरून समोरासमोर या, अपक्ष लढू’

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

You may have missed