Pune Crime News | “मी इथला भाई, माझी पोलिसांना खबर देतो, त्याला आज मारून टाकतो”; कोयता उगारून दहशत माजविणारा अटकेत

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कोयता उगारून दहशत माजविणाऱ्या सराईताला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली.

राहुल विठ्ठल वांजळे Rahul Vitthal Wanjale (वय २७, रा. स्वरा हाईट्स, न्यू अहिरे गाव, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी भोसले यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत होते.  तेव्हा बातमीदारांकडून माहिती मिळाली की, राहुल वांजळे हा  गणपती माथा परिसरात कोयता घेऊन आला. ‘मी इथला भाई आहे. माझी  पोलिसांना खबर देतो, त्याला आजच मारून टाकतो’, असे जोरजोरात ओरडून कोयता उगारून दहशत निर्माण करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वांजळे याला अटक केली. सहायक पोलीस फौजदार व्ही. व्ही.गांगुर्डे तपास करत आहेत.

You may have missed