Pune Crime News | आईला मारहाण करणाऱ्या मुलाला अडविणार्या दोघा पोलिसांना खाली पाडून केली मारहाण, विश्रांतवाडी पोलिसांनी मुलाला केली अटक
पुणे : Pune Crime News | आईला मारहाण करीत असल्याचा नियंत्रण कक्षाला कॉल आल्याने दोघे पोलीस मार्शल तेथे गेले. त्यांनी मुलाला आईला मारु नको, असे समजावून सांगत असताना त्या मद्यपी मुलाने दोघा पोलिसांनी खाली पाडून मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या गणवेशाची बटणे तोडली. मदतीला आलेल्या पोलीस अंमलदारांना शिवीगाळ करुन दमदाटी करणार्या मुलाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
श्रेयश संजय कोराड Shreyash Sanjay Korad (वय ३०, रा. फुलेनगर, येरवडा) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फुलेनगर येथील वि. द. घाटे शाळेशेजारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश काची यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, मुलगा मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन त्याची आई उज्वला कोराड (वय ५५) हिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलीस तातडीने तेथे पोहचले. श्रेयश कोराड याला समजावून सांगत असताना व आईला मारहाण करण्यापासून परावृत्त करत असताना श्रेयश याने फिर्यादी यांची कॉलर पकडून खाली पाडले. त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सरकारी गणवेशाची बटणे तोडली. त्यांच्या मदतीला आलेल्या पोलीस अंमलदार धुगे यांना देखील शिवीगाळ करुन दमदाटी केली. या घटनेनंतर त्यांनी पोलीस मदत मागविली. तपास पथकाचे अंमलदार तेथे आल्यावर त्यांना देखील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
