Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: स्क्रुड्रायव्हर छातीत खुपसून रिक्षाचालकाचा खून ! दारू पिताना झालेल्या वादाचे पर्यावसन झाले खूनात

Murder

पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | देशी दारुच्या दुकानात दारु पित बसले असताना त्यांच्यावर वाद झाला. तेव्हा रिक्षाचालकाने चप्पलेने मारहाण केली. त्याचा राग आल्याने बगाडे याने त्याच्याकडील स्क्रु ड्रायव्हर रिक्षाचालकाच्या छातीत गळ्याजवळ खुपसून त्याचा खून केला. (Murder Of Rickshaw Driver)

https://www.instagram.com/p/DA0Sw14CCf-

अमीर मकबुल खान (वय ३४, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी दौलत मकबुल खान (वय ३१, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यशवंत आत्माराम बगाडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विजय बारचे समोर कुणाल रिव्हर साईड सोसायटीचे बाजुला रविवारी रात्री पावणे दहा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DA0QJTTJNPE

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ अमीर खान हे रिक्षाचालक आहेत. ते दोघे, त्यांचे मित्र फिरोज आयुब खान व इतर एक जण असे विजय देशी दारुचे दुकानामध्ये दारु पित बसले होते. तेथेच यशवंत बगाडे हा ही दारु पित बसला होता. दारु चढल्यानंतर त्यांच्यामध्ये बोला चालीवरुन वाद झाला. त्यावेळी अमीर खान याने बगाडे याला चप्पलने मारले. वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने यशवंत बगाडे याने त्यांच्याकडील स्क्रु ड्रायव्हर अमीर खान याच्या छातीत गळ्याजवळ मारला. स्क्रु ड्रायव्हर खोलवर गेल्याने अमीर खान याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक करंबळकर तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA0ME-2CMFI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsingh Naik Nimbalkar | रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान; म्हणाले – ‘एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरून समोरासमोर या, अपक्ष लढू’

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

You may have missed