Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsingh Naik Nimbalkar | रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान; म्हणाले – ‘एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरून समोरासमोर या, अपक्ष लढू’

सातारा: Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsingh Naik Nimbalkar | रामराजे नाईक निंबाळकर यांनी खटकेवस्ती (ता.फलटण) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान दिले आहे. पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/DAz6HUcpoq6
मेळाव्यात बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, आजच्या सभेमध्ये फक्त जो विषय अजेंड्यावर नाही, तो राज्यावर कसा गेला याचा शोध घेतला पाहिजे. आज तुम्ही अजित पवारांना सोडून चाललाय का असा प्रश्न मला अनेकांनी केला.
https://www.instagram.com/p/DAybSxtJ4yx
राज्यातील माध्यमातून माझ्याकडे चौकशी झाली. त्यावर बरीच चर्चा झाली. ही चर्चा सर्वत्र पसरली, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता ते म्हणाले परंतु कदाचित ही बातमी विरोधकांनीच दिली असावी. कारण त्यांना असल्या अफवा पसरवण्याची घाणेरडी सवय आहे.
https://www.instagram.com/p/DAyUZaUJ_xY
जर महायुतीतून रामराजांची ब्याद गेली, तर कमळाच्या चिन्हावर उभे राहण्यास आम्ही मोकळे असे त्यांना वाटत असेल. त्यांनी भाजपाचा आधार घेऊन पोलीस प्रशासनाला बरोबर धरून माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा उद्योग सुरू केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे.
https://www.instagram.com/p/DAyBx-9pkay
जर त्यांना निवडणुकीची एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे यांनी विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
https://www.instagram.com/p/DAx7iCDp7Kc
ते पुढे म्हणाले, आजवर मी सांगत होतो, ते कार्यकर्ते ऐकत होते; परंतु आता कार्यकर्ते मला सांगत आहेत. हा मोठा ऐतिहासिक क्षण आहे. जर कार्यकर्त्यांनी काही ठरवलेच तर मी काही बोलू शकणार नाही, अशी वेळ पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी माझ्यावर येऊ देऊ नये.
https://www.instagram.com/p/DAx0iMjpy-1
कार्यकर्त्यांची सुरक्षितता व विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण शरद पवार यांना दुखवून अजित पवारांकडे गेलो. फलटण तालुक्याच्या इतिहासामध्ये आजवर चौथ्यांदा आमदारकीची संधी कोणालाही मिळालेली नाही. ती आम्ही आणि अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना दिली आहे. ते कुठूनही उभे राहिले तरी भरघोस मतांनी निवडून येतील, त्यांनी मतदारसंघाची संस्कृती जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
https://www.instagram.com/p/DAxvcR5J8kI
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’