Rohit Pawar Vs Ram Shinde | रोहित पवार अन् राम शिंदेंमध्ये शाब्दिक वॉर; “माझी कॉपी करण्यासाठी सल्लागार नेमले पण…”

Rohit Pawar On Ram Shinde

कर्जत-जामखेड : Rohit Pawar Vs Ram Shinde | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही (Karjat Jamkhed Assembly Constituency) चांगलंच राजकारण तापलं आहे. (Sharad Pawar NCP MLA) आमदार रोहित पवार आणि भाजपाचे आमदार (BJP MLA) राम शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.

https://www.instagram.com/p/DA-YcD5pjsm

“विरोधकांनी २० लाख रुपये देऊन सल्लागार नेमला आहे आणि माझी कॉपी करायला त्यांनी सुरुवात केली आहे”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी नाव न घेता राम शिंदेंवर केली. यानंतर राम शिंदे यांनीही पलटवार करत ” माझ्या पेहरावावर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा?”, असा सवाल केला.

https://www.instagram.com/p/DA-TMdSpIXJ

दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान राम शिंदेंवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा का होतो? हे मला माहिती नाही. आता तर कहरच झाला. मी युवा आहे, पण काहींनी आता २० लाख रुपये देऊन सल्लागार नेमला आहे.

https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ

त्या सल्लागाराला सांगितलंय की, रोहित पवारांना कॉपी करायचं. समाजकारण आणि राजकारणात काम करत असताना माझ्या डोक्याचे केस पांढरे झाले, पण तरीही मी ते काळे करत नाही. मात्र, २० लाख रुपये देऊन त्यांनी नेमलेल्या सल्लागाराने त्यांना सांगितलं की तुम्हाला युवा दिसावं लागेल. मग काय तुमचे केस पाढंरे झालेत ते काळे करा. मग त्यांनी काळे केले. तुम्ही आता युवकांसारखे कपडे घालायला सुरुवात करा. मग त्यांनी तसे कपडे घालायला सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9

आपण एक राखी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर त्यांनीही लगेच कार्यक्रम घेतला. आता मला हे कळत नाही, जे आपण करत आहोत जर तेच ते करत असतील तर त्यांनी सल्लागार कशाला नेमला?”, असे म्हणत रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.

https://www.instagram.com/p/DA8uAzBJgSY

दरम्यान या टीकेला राम शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ” मला वाटतं विरोधकांना मतदारसंघातील सर्व प्रश्न कळून चुकले आहेत. त्यामुळे ते आता माझ्या पेहरावावर बोलायला लागले आहेत. ते आता माझ्या पेहरावावर आले आहेत. मी एक ग्रामीण भागातील व्यक्ती आहे.

https://www.instagram.com/p/DA8qCRMiPX1

विरोधकांना माझ्या पेहरावावर बोलायला सुरुवात केली, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, त्यांना दुसरे प्रश्न शिल्लक राहिले नाहीत.
त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघात पाच वर्षात काय केलं? हे सांगावं”,
असे म्हणत रॅम शिंदे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे.

https://www.instagram.com/p/DA8ogY2JDG9

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed