Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकरच्या शरीरात 2 गोळ्या, तब्बल 24 वार; PM रिपोर्टमधून माहिती समोर

Vanraj-Andekar-Murder-Case

पुणे: Vanraj Andekar Murder | पुण्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार (Koyta Attack) करण्यात आले होते (Murder In Nana Peth Pune). या घटनेत ते गंभीर जखमी झाले, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. (Vanraj Andekar Murder)

याप्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सयाजी गायकवाड (Somnath Sayaji Gaikwad), संजीवनी कोमकर (बहिण), गणेश कोमकर (जावई) याच्यासह गणेशचे भाऊ, अनिकेत दुधभाते अशा तब्बल १५ जणांना अटक केली आहे. तर, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

वनराज आंदेकर यांचा नाना पेठेत रविवारी (दि.१) खून करण्यात आला. खूनात घटनास्थळावर पाच पुंगळ्या मिळाल्या होत्या. आंदेकर यांना नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याची माहिती मिळाली नव्हती. प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्यांच्यावर १४ वार झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. (Vanraj Andekar PM Report)

शवविच्छेदन केल्यानंतर अंतिम अहवालात आंदेकर यांना दोन गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर २४ वार झाले असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. दोन गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर आणि दुसरी गोळी कंठाजवळ लागली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed