Vishrantwadi Pune Crime News | मॉर्निग वॉक करणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकाविणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Arrest

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | मॉर्निग वॉकला जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले होते. पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरुन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. कृष्णा ऊर्फ किशोर अशोक पवार (वय २६, रा. वडगाव घेणंद, आळंदी, ता. खेड) असे चोरटयाचे नाव आहे.

https://www.instagram.com/reel/DAlP_O0JJOZ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

टिंगरेनगरमध्ये राहणार्‍या महिला २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मॉर्निंग वॉकला जात होत्या. सनसाईन हॉॅटेलचे समोरील रोडवर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्याने हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार अमजद शेख, संजय बादरे, संपत भोसले व किशोर भुसारे यांना आरोपींनी वापरलेल्या मोपेडचा नंबर मिळाला. तो आळंदी परिसरात रहात असले तांत्रिक विश्लेषणावरुन समजले.

https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr

त्यानुसार पोलीस आंळदी परिसरात त्याचा शोध घेत असताना तीच मोपेड घेऊन एक जण जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यामध्ये चोरुन नेलेले मंगळसुत्र ओंकार रमेश चव्हाण (रा. आळंदी) याच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून मंगळसुत्र जप्त केले. या गुन्ह्यातील मंगळसुत्र व वापरलेली मोपेड असा ६६ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशंवत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Rohit Pawar | ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले…’ सुप्रिया सुळेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या – ‘शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर…’

Maharashtra Politics | फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला; भाजपचे कार्यकर्ते चिंतेत

You may have missed