Warje Malwadi Pune Crime News | वारजेत ३६ वर्षाच्या गतीमंद तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीतील ४७ वर्षाच्या नराधमाचे कृत्य

Molestation-Case

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | घरात कोणी नाही, हे पाहून आत शिरुन गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police) एका ४७ वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAz6HUcpoq6

याबाबत एका ६१ वर्षाच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी सव्वा दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ३६ वर्षाची मुलगी घरात एकटी होती. ती गतीमंद आहे. मुलगी घरातील किचनमध्ये भांडी घासत असताना हा नराधम आत आला. आई कुठे आहे, आई कुठे आहे, असे विचारले. तेव्हा तिने मला माहिती नाही.

असे सांगितल्यावर त्याने हॉलमधील दरवाजाची कडी लावून तिची पप्पी घेतली. तिला दिवाणावर पाडले. ती ओरडायला लावली. तेवढ्यात त्याने तिचे तोंड दाबून धरले. तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याचा हात जोरात झटकून जोरजोरात ओरडली. तेव्हा तो घरातून पळून गेला. फिर्यादी या घरी आल्यावर तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAyUZaUJ_xY

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsingh Naik Nimbalkar | रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान; म्हणाले – ‘एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरून समोरासमोर या, अपक्ष लढू’

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

You may have missed