Lonikand Police Station | लोणीकंद पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Lonikand Police Station

शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Lonikand Police Station | पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्या संकल्पनेतून येरवडा विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे व लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांच्या समस्या / तक्रारी निवारण करणेसाठी ” तक्रार निवारण दिनाचे” आयोजित करण्यात आले होते.

यावेळी येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी, पोलीस उपनिरीक्षक राहूल कोळपे, पोलीस उपनिरीक्षक निलेश घोरपडे , पोलीस उपनिरीक्षक मोनिका भदे,पोलीस हवलदार दिपक ठाणगे, बाळासाहेब हराळ, रितेश काळे, निखिल गोपाळे, अशिष लोहार, विठ्ठल केदारी यांच्यासह पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

लोणीकंद पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक ०६ रोजी सकाळी १०.३० ते २.०० या कालावधीत
पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी पोलीस स्टेशनला
तक्रारी होत्या परंतु त्यांचे अद्याप निवारण झालेले नव्हते असे बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सर्व नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारींचे व समस्याचे निवारण
सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी केले.आलेल्या नागरीकांचे समस्यांचे निवारण झाल्याने समाधान व्यक्त करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

You may have missed