Pune Crime News | 70 हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Chatushrungi police caught a notorious criminal with over 70 cases of robbery after a pursuit

पुणे : Pune Crime News | औंध येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेल्याच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगाराचा माग काढला. तो लातूरला पळून जात असताना पुणे सोलापूर रोडवर त्याचा पाठलाग करुन या सराईत गुन्हेगाराला पकडले.

राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड Rajabhau, alias Raju Khemu Rathod (वय ४४, रा. आर्वी, साई रोड, जि. लातूर, मुळ रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावुन नेणार्‍यांमध्ये प्रामुख्याने दोघे जण असतात. पाठीमागे बसलेला महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेतात. परंतु, राजू राठोड हा एकटाच अशा जबरी चोर्‍या करीत होता. त्याच्यावर यापूर्वी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, लातूर, नाशिक शहर, सातारा अशा विविध ठिकाणी ७० पेक्षा अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

औंध  परिसरातून २० ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता महिला पायी जात असताना दुचाकीवरील चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.

चतु:श्रृंगी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सलग १० दिवस औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरुड, सुस, लवळे, धायरी, नाना पेठ, हडपसर या परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून ही जबरी चोरी राजू राठोड यानेच केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर मिळविला. त्यावरुन त्याचा शोध घेत असताना तो पिंपळे निलख येथे तो स्पॉट झाला. त्यानंतर रात्रभर पोलीस पथक त्याचा शोध घेत होते. तो सोलापूर रोडकडे जात असल्याचे लक्षात आले. तो लातूरला जाणार असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर आपला मोर्चा वळविला. तेव्हा एका स्पोर्टस बाईकवरुन एक जण जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन हडपसर परिसरात त्याला पकडले. त्याच्याकडून मोटारसायकल व चोरलेले सोन्याचे मंगळसुत्र असा ३ लाख ९३ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक शितल जाधव यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार  शिर्के, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, भुवनेश पवार, रवींद्र दहातोंडे, अजित गायकवाड, योगेश बडगे, सूर्यकांत मानकुंबरे यांनी केली आहे.

You may have missed