Ajit Pawar NCP | ‘तुम्ही हॉटेल पॉलिटिक्स करणार का?’ अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले – “आम्हाला जे…”

Ajit Pawar

मुंबई : Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) काही महिनेच बाकी राहिले आहेत. त्यामुळे मतदारसंघात इच्छुकांची बॅनरबाजी सुरु झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पक्षाकडूनही जागावाटपाच्या संदर्भाने बैठका सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीला घेऊन राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाच्या आमदारांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले (Siddhivinayak Temple Mumbai). दरम्यान यावेळी चांगल्या कामाची सुरुवात देवाचं दर्शन घेऊन केली जाते. म्हणून आम्ही मुंबईत सिध्दीविनायकाचं दर्शन घेतोय असं असे अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र दौरा काढला का असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता अजित पवार म्हणाले, ” महाराष्ट्राचा दौरा विधानपरिषदेच्या दृष्टिकोनातून नसून आमचा पक्ष मजबूत करण्याच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र दौरे करणार आहोत, त्याची ही सुरुवात आहे असे पवार म्हणाले.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांना यावेळी विचारणा केली. आमदारांना सुरक्षित करण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स करणार का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता त्यावर अजित पवारांनी सूचक शब्दांत विधान केलं. “आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू”, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. “प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच प्रयत्न सगळे करत आहेत. महायुतीचे (Mahayuti) सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

विधानपरिषदेच्या सभापती (Vidhan Parishad Sabhapati) पदाची निवडणूक होणार
असून त्यासंदर्भातही अजित पवारांना विचारणा करण्यात आली.
त्यावेळी विरोधकांच्या भेटीगाठींवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
“त्यांनी कुणाला भेटावं हा त्यांचा अधिकार आहे. सभापतींची निवड हा सरकारचा प्रश्न आहे.
महायुतीचे नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील”, असं अजित पवार म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed