Lonavala Bhushi Dam | भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवर पाण्याचा वेग प्रचंड; पर्यटकांना पोलिसांकडून आवाहन

Lonavala Bhushi Dam (3)

लोणावळा : Lonavala Bhushi Dam | लोणावळ्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने पर्यटकांनी सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात जाऊ नये असे आवाहन लोणावळा पोलिसांकडून करण्यात आले आहे. लोणावळा परिसरात काल शनिवार पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले असून भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यामध्ये जाऊन उभे रहाणे शक्य नसल्याने पर्यटक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ शकतात. आज सकाळी पोलीस प्रशासनाने भुशी धरण परिसरातील पाण्याच्या प्रवाहाची पाहणी करत पर्यटकांना धरण भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. (Lonavala Bhushi Dam)

तसेच जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले
असल्याने त्यांच्या खाली थांबणे अथवा डोंगर भागात जाण्याचा प्रयत्न करणे
हे धोकादायक ठरणारे असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी.
तसेच धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन लोणावळा पोलीस व
नगर परिषद प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड