Pune Camp Crime News | पुणे : दुचाकीस्वाराची मुजोरी; वाहतूक पोलिसाला फरफटत नेले

Pune Crime News | Four people including a woman beaten up for supporting a rival candidate; Baburao Chandere had been supported, incident in Baner

पुणे : Pune Camp Crime News | पुणे कॅम्प परिसरातील महाविर चौकातून भरधाव वेगाने निघालेल्या मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला (Pune Traffic Police) फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वाहतूक पोलीस कर्मचारी दादासो रघुनाथ कर्चे (वय 44) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत कर्चे यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी लाल रंगाच्या टी.व्ही.एस. ज्युपीटर दुचाकी चालकावर भारतीय न्याय संहिता कलम 132, 125 मोटार वाहन कायदा 134(अ),134(ब), 119/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दादासो कर्चे हे लष्कर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. रविवारी (दि.14) सायंकाळी चारच्या सुमारास कर्चे हे कॅम्प पुणे येथील महाविर चौक परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन नो-एन्ट्री मधून भरधाव वेगाने निघाला होता. पोलीस कर्मचारी कर्चे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकीस्वाराने दुचाकी त्यांच्या अंगावर घातली.
प्रसंगावधान राखून कर्चे यांनी दुचाकीला पाठीमागून पकडले. त्यानंतर दुचाकीस्वाराने वाहन न थांबवता तसेच पुढे नेले.
पोलीस कर्मचारी कर्चे यांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दादासो कर्चे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Camp Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed