Suhas Diwase On Puja Khedkar Allegations | IAS पूजा खेडकरच्या छळाच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ योग्य वेळ आल्यावर…’
पुणे : Suhas Diwase On Puja Khedkar Allegations | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhas Diwase) यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे (Washim Police) दाखल केली होती. पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थीं म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collector Office) त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी आपल्या तक्रारीत वाशिम पोलिसांकडे केला. खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात हा आरोप पुण्यातील असल्याने वाशिम पोलिसांनी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग केले. पुणे पोलिसांनी समन्स देऊनही जबाब देण्यास उपस्थित न राहिल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) पुन्हा पूजा खेडकर यांना समन्स बजावले. यामध्ये पुजा खेडकरने स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी २० जुलैला उपस्थित राहावे यासाठी पुणे पोलीसांनी दुसऱ्यांदा नोटीस दिली आहे. (Suhas Diwase On Puja Khedkar Allegations)
तर पूजा खेडकरने केलेल्या आरोपाबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
पूजा खेडकरांनी जे आरोप केलेले आहेत त्यांची नोटीस मला मिळाली नाही,
अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे.
योग्य वेळ आल्यावर मी याबाबत बोलणार, असंही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक