Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार गुंडाने पिस्टल हवेत फिरवून माजवली दहशत ! पिंपरी पोलिसांनी पिस्टल व २ जिवंत काडतुसासह केली अटक

Arrest

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार केले असताना पिंपरीमध्ये येऊन पिस्टल हवेत फिरवून दहशत माजविणार्‍या गुंडाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे (Tadipar Criminal Arrested). त्यांच्याकडून पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pistol Seized)

गणेश भुंगा कांबळे (वय २१, रा. भाटनगरसमोर, निराधारनगर, पिपंरी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याचा साथीदार तौफिक ऊर्फ तौफ्या चांद शेख (वय १८, रा. पिंपरी) हा पळून गेला आहे.

याबाबत पोलीस शिपाई विकास रेड्डी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार निराधारनगर येथे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कांबळे याला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त यांनी दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना गणेश कांबळे हा तौफिक शेख याला घेऊन शनिवारी रात्री निराधारनगर येथे आला होता. आल्या आल्या त्याने आपल्याजवळील पिस्टल हवेत फिरवून मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करु लागला. मला जो कोणी नडणार त्याची सुट्टी नाही हे लक्षात ठेवायचे असे ओरडत होता. इथले भाई आम्हीच, आमचेकडे हत्यार आहे,
आम्हाला सर्वांनी घाबरुन राहायचे, जास्त मस्ती करु नये, असे ओरडत शिवीगाळ करुन लोकांना धमकी देत दहशत पसरवित होता.
हे समजताच पोलीस तातडीने निराधारनगर येथे पोहचले. पोलिसांना पाहून तौफिक शेख पळून गेला.
पोलिसांनी गणेश कांबळे याला पिस्टल व २ काडतुसांसह अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक जिनेडी तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed