Pune Crime Court News | पुणे : खुनाच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर; ॲड. सिद्धांत मालेगावकर यांचा सखोल व कायदेशीरदृष्ट्या अभ्यासपूर्ण युक्तिवाद
पुणे : Pune Crime Court News | काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३(१) सह अन्य कलमांन्वये दाखल खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी साहिल सागर शेलार यास पुणे येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी जामीन मंजूर केला. (Adv. Siddhant Malegaonkar)
प्रकरणाची पार्श्वभूमी अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, दि. ३ मे २०२६ रोजी ससाणेनगर, हडपसर येथे पूर्वीच्या वादातून गणेश बिरादार यांच्यावर मारहाण करण्यात आली. या घटनेत सिमेंटच्या ठोकळ्याने झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, या गंभीर प्रकरणात आरोपीवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता.
– महत्वाचा आणि सखोल व कायदेशीरदृष्ट्या अभ्यासपूर्ण युक्तिवाद –
प्रकरणाचे गांभीर्य, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे कथन आणि आरोपीवरील गंभीर आरोप अशा प्रतिकूल परिस्थितीत ॲड. सिद्धांत मालेगावकर यांनी कायद्याच्या तरतुदी, उपलब्ध पुरावे, आरोपीची नेमकी भूमिका आणि न्यायालयीन निर्णयांचा सखोल अभ्यास करून प्रभावी युक्तिवाद केला. आरोपीचा मृत्यू घडविण्याचा प्रथमदर्शनी हेतू स्पष्ट होत नसणे, प्राणघातक वाराची जबाबदारी प्रथमदर्शनी आरोपीवर निश्चित होत नसणे, तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल होणे आणि सहआरोपींना मिळालेला जामीन या महत्त्वपूर्ण बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
– युक्तिवादानंतर न्यायालयाचा दिलासा –
बचाव पक्षाचा युक्तिवाद व प्रकरणातील महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेऊन मा. न्यायालयाने आरोपीस ५०,००० रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व समतुल्य रकमेच्या एक किंवा दोन जामीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे मालेगावकर अँड असोसिएट्स (Malegaonkar & Associates) यांच्या वतीने ॲड. सिद्धांत श्रीकांत मालेगावकर (Adv. Siddhant Shrikant Malegaonkar) यांच्या नेतृत्वाखाली ॲड. शुभंकर मालेगावकर (Adv. Shubhankar Malegaonkar), ॲड. प्रेरणा बाविस्कर (Adv. Prerna Baviskar), ॲड. आकाश मायने (Adv. Akash Mayne), ॲड. अभिषेक चौधरी (Adv. Abhishek Chaudhary), ॲड. ईशम देशपांडे (Adv. Isham Deshpande), अमोल घवाते (Amol Ghavate), ॲड. ऊर्जा नेऊिगावकर (Adv. Urja Nevigaokar), ॲड. प्रकाश येडगे (Adv. Prakash Yedge), ॲड. कुणाल शिरगिले (Adv. Kunal Shirgile) व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले.
