Sharad Pawar NCP | महायुतीला धक्का! कोल्हापुरात दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, ‘तुतारी’ फुंकण्याची शक्यता
कोल्हापूर: Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून राष्ट्रवादी शरद पवार गट अधिक सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी गावभेटी दौरे सुरु करत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. यंदा महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आणायचे असे भाष्य शरद पवार गावभेटी दौऱ्यात करताना दिसत आहेत. (Sharad Pawar NCP)
भाजप (BJP) आणि अजित पवार गटातील (Ajit Pawar NCP) अनेक नेते शरद पवार गटात येण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी हातात तुतारी घेतलेली आहे. दरम्यान आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. (Kolhapur Political News)
दोन बडे नेते एकाच वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. के पी पाटील (KP Patil Kolhapur) आणि ए.वाय पाटील (AY Patil Kolhapur) हे दोघेही शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यामुळे ‘घड्याळ’ सोडून दोन्ही पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ‘तुतारी’ (Tutari) फुंकण्याची शक्यता आहे.
आज भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) पक्षाला रामराम ठोकून ‘तुतारी’ हाती घेणार असतानाच महायुतीतील (Mahayuti) दुसऱ्या घटक पक्षालाही त्याच दिवशी डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.
के.पी. पाटील हे कोल्हापुरातील राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून
(Radhanagari Bhudargad Vidhan Sabha) निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.
मात्र विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar)
हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena Shinde Group) आहेत.
विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट मिळणं निश्चित मानले जात आहे.
आता महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने के. पी. पाटलांनी महाविकास आघाडीचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे आता के. पी. पाटील ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक