Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

Chandrashekhar Bawankule

मुंबई : Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जागावाटपावर चर्चा सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महायुतीत जागावाटपावरून मित्र पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. ” महायुतीतील ८०-९० जागा लढविणार हा जागावाटपाचा फॉर्म्युलाच संपला असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन करायचे आहे.

या नेत्यांनी ८० नाही ९० नाही कुठलाही आकड्यावर न जाता जिथे अजित पवार जिंकतील तिथे अजित पवार लढतील, जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तिथे त्यांचा आग्रह, जिथे आमचे उमेदवार तेथे आमचा आग्रह मान्य केला जाणार आहे. फक्त निवडून येणारे उमेदवार देऊ, हा महायुतीचा आग्रह असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. (Mahayuti Seat Sharing Formula)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed