Policeman Death News Pune | पुणे :  पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Policeman Death News Pune | Pune: Police constable Dattatraya Telange passed away due to a heart attack

पुणे : Policeman Death News Pune | पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी पहाटे निधन झाले.  ते  पोलीस उपायुक्त परिमंडळ ६च्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर होते.

पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय ४३) हे सध्या काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये नियुक्तीला होते. त्यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ च्या कार्यालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. अतिशय मनमिळावु म्हणून त्यांची ओळख होती. गणेशोत्सवातील बंदोबस्त संपवून ते घरी गेले होते. हांडेवाडी रोडवरील ई सी पी वास्तू कॅम्पस येथील घरी असताना शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील असंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.