Bavdhan Pune Crime News | पुणे : पत्नीबरोबर अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा गळा चिरुन खून; मध्यरात्रीची घटना

Murder In One Sided Love

पुणे / पिंपरी : Bavdhan Pune Crime News | पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याची घटना समोर आली आहे. (Suspicion of an immoral relationship)

प्रवीण महतो (वय २५, रा. बावधन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बावधन पोलीस चौकीजवळील एका नर्सरीमध्ये मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. (Bavdhan Murder Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीबरोबर प्रवीण महतो यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. काल रात्री प्रविण महतो हा झोपला असताना राजीवकुमार महतो याने साथीदाराच्या मदतीने प्रवीण याचा गळा चिरुन खून केला. या घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजीवकुमार महतो व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Hinjewadi Murder Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed