IPS Shivdeep Lande Resigns | बिहारचे सिंघम मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंचा तडकाफडकी राजीनामा; कारण अस्पष्ट
पुणेरा आवाज – IPS Shivdeep Lande Resigns | बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनाम दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. बिहारमध्ये ते लोकप्रिय अधिकारी म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी बिहारमधील अरारिया, पूर्णिया आणि जमलपूरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम प्रभावी काम केले होते. सध्या ते बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यांनतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणती चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्ये राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
इलेक्ट्रीकल इंजिनिअर नंतर झाले आयपीएस अधिकारी
लांडे यांचा 29 ऑगस्ट 1976 ला बुलढाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इंजिनिअरची पदवी मिळवली. नोकरीनिमित्त मुंबईला येऊन अनेक कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. त्यांनतर यूपीएससीची परीक्षा दिली. ते 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
जमालपूर येथे पहिली पोस्टिंग
आयपीएस झाल्यानंतर लांडे यांची प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून बिहारच्या मुंगेरजवळ जमालपूर येथे नियुक्ती झाली होती. हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जात होता. 2005 साली नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक सुरेंद्र बाबूंची हत्या केली होती. त्यामुळे पोलीस या ठिकाणी जाण्यास घाबरत होते. मात्र पहिल्याच नियुक्तीत लांडे यांनी आपल्या कामची छाप पाडून स्थानिकांचा विश्वास मिळवला होता. स्थानिकांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेत असल्यामुळे लांडे यांना स्थानिकांचे सहकार्य मिळत गेले आणि त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली. लांडे यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया केल्या ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव देखील टाकण्यात आला. त्यांची बदलीही करण्यात आली होती मात्र बदली विरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती.
महाराष्ट्रात देखील प्रभावी कामगिरी
लांडे हे मध्यतरी मुंबईत महाराष्ट्र पोलिस सेवेतही कार्यरत होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा