Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवण बनविण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

koyta

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दारुच्या नशेत भांडणाच्या कारणावरुन तसेच जेवण बनविण्यास नकार दिल्याने वेटरने दुसर्‍या वेटरवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने मानेवर, हातावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

https://www.instagram.com/p/DAYVZ1TCnrC

याबाबत आशिक अब्बास अली शेख (वय ३१, रा. माथेरान हॉटेल, कोयाळी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयुब अब्दुल शेख (वय ३८, रा. माथेरान हॉटेल, कोयाळी, ता. खेड) याला अटक केली आहे. ही घटना माथेरान हॉटेलमध्ये २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. (Koyta Attack)

https://www.instagram.com/p/DAYSdaHJxVY

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बरकडे यांचे हॉटेल माथेरान आहे. तेथे दोघेही जण वेटर म्हणून कामाला आहेत. हॉटेलमधील फॅमिली रुममध्ये त्यांच्यात दारुच्या नशेत भांडणे झाली. यावेळी फिर्यादी यांनी जेवण बनविण्यास नकार दिला. त्यामुळे आयुब याने आशिक याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन ऊस तोडण्याचा कोयता आणून फिर्यादीस तुला आता कायमचाच संपवतो, असे म्हणून कोयत्याने फिर्यादीचे मानेवर, हातावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAYRM0KJlDI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed