Maharashtra Assembly Election 2024 | मविआ मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! भाकपची मविआकडे 15 जागांची मागणी, जागा न दिल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारी

Communist Party Of India - CPI)

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) तयारी सुरु झाली आहे. लोकसभेला चांगले यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मविआ मध्ये काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena Thackeray Group) आणि राष्ट्रवादीचा (Sharad Pawar NCP) समावेश आहे.

https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6

याचबरोबर काही घटक पक्षही समाविष्ट आहेत. त्यामुळे जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (Communist Party Of India – CPI) मविआ कडे १५ जागांची मागणी केली असून जागा न दिल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारी दर्शवली आहे.

https://www.instagram.com/p/DAaVNfgJ3Az

भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नागपुरात पार पडली. त्यामध्ये महाविकास आघाडीने समाधानकारक जागा न दिल्यास स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी ठेवा, अशी सूचनाही वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DAaTd4opUq-

भाकपने महाविकास आघाडीकडे मागणी केलेल्या जागांमध्ये नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि दारव्हा, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, अहमदनगर मधील शेवगाव पाथर्डी, मुंबईतील सायन कोळीवाडा, ठाण्यातून भिवंडी. तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये पश्चिम छत्रपती संभाजीनगर, नाशिकमधून नाशिक पूर्व इत्यादी जागांवर दावा करत मविआकडे या जागांची मागणी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAaSTD1JBCM

जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भाकपची प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे मविआमध्ये भाकपने केलेली मागणी मान्य होते का, की भाकप आगामी विधानसभा निवडणुकीत काही वेगळा निर्णय घेत स्वतंत्रपणे आपले उमेदवार मैदानात उतरवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/DAaMouwJF1z

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed