Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरपुढे आता अमित शहांची चाणक्यनीती; विधानसभेला फटका रोखण्यासाठी दिला कानमंत्र
छ. संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) भाजप (BJP) बरेच बॅकफूटला आल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक जागा केवळ मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पराभूत झाल्या. मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे आता विधानसभेसाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. मराठवाड्यात (Marathwada) विधानसभेच्या ४६ जागा आहेत. पैकी ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य महायुतीने (Mahayuti) ठेवले आहे.
https://www.instagram.com/p/DAaawvhi31f
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपने १६ तर शिवसेनेने १२ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहांनी विदर्भ, मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. विधानसभेच्या ३० जागा जिंकण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/DAaYoyTJ4-S
मराठवाड्यात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु आहे. तसेच त्यांच्या रडारवर देवेंद्र फडणवीस असल्याने याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. भाजपचा मोठा पराभव झाला. यावरून अमित शहांसमोर जरांगे फॅक्टर आणि मराठा आंदोलन यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यावर शहांनी ते आमच्यावर सोडा असे म्हणत यावर रणनीती आखली असल्याचे संकेत दिले.
https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6
“गुजरातमध्ये आम्ही अशाच आंदोलनाचा सामना केला होता. तिथे पटेल समाजाचं आंदोलन सुरु होतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय आमच्यावर सोडा. तुम्ही बूथवरील मतदान वाढवण्यावर लक्ष द्या”, अशा सूचना शहांनी दिल्या आहेत. हिंदुत्वाची लाईन मोठी केल्यास जातीपातीची रेष त्यापुढे आखूड ठरेल, अशी शहांची भूमिका आहे.
https://www.instagram.com/p/DAaVNfgJ3Az
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’