Weather News | राज्यात यंदाचा हिवाळा सामान्यपेक्षा कडक राहणार तर अवकाळीचा मुक्काम डिसेंबरपर्यंत, हवामान विभागाची माहिती
मुंबई: Weather News | देशात अवकाळी पावसाचा मुक्काम डिसेंबरपर्यंत राहणार असून, तो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यातच सुरू होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ११५ टक्के अवकाळी यंदा बरसेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
तसेच देशाच्या काही भागांत यंदा थंडी कमी राहणार आहे. यात पूर्वेकडील राज्ये आहेत, दक्षिण भारतात किमान व कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. मात्र, मध्य भारतात थंडी चांगलीच जाणवणार आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अन् महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मान्सून परतताच साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडेल, असा अंदाज आहे.
https://www.instagram.com/p/DAm9yjtJQBK
कमाल तापमानात १ ऑक्टोबरपासूनच चांगली वाढ झाली आहे. मात्र, मान्सून परतण्यास अजून अवकाश आहे. तो राज्यातून १० नंतर जाईल. त्यानंतर कमाल तापमानात आणखी मोठी वाढ होईल. दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी चागलीच जाणवणार आहे.
https://www.instagram.com/p/DAnEvrbC168
थंडी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन डिसेंबरपर्यंत चांगलाच कडाका राहील. मात्र, रात्रीच्या तापमानात अधूनमधून वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAnNN90Cpnz
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’