Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा; म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

Ramdas Kadam - Eknath Shinde

रत्नागिरी : Shivsena Shinde Group News | महायुतीत जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing Formula) वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी अगदी काही दिवस उरलेले असताना पक्षातील अंतर्गत कलह समोर येत आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघात (Guhagar Assembly Constituency) विपुल कदम (Vipul Kadam) यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढं आल्यामुळं शिंदे यांच्या पक्षात नाराजीनाट्य रंगलं आहे. पक्षाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच इशारा दिला आहे.

https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2

या मतदारसंघात ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना शिंदे यांच्या पक्षाने विपुल कदम यांचे नाव निश्चित केल्याने रामदास कदम आक्रमक झाले आहेत. विपुल कदम हे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) यांचे मेहुणे आहेत. रामदास कदम यांना ही उमेदवारी मान्य नाही. रामदास कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत.

https://www.instagram.com/p/DAldwGhpRx7

विपुल कदम कोण आहेत? त्यांचा गुहागरशी संबंध काय आणि त्यांना उमेदवारी कशी मिळते,’ असा सवाल त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपला जवळचा नातेवाईक म्हणून त्यांना उमेदवारी देणार असतील आणि नवीन पायंडा पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना रुचेल असे वाटत नाही, असे रामदास कदम यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAlcjLRp3CR

ते पुढे म्हणाले, शिवसैनिकांनी वर्षानुवर्षे काम केलंय,
त्यांना बाजूला ठेवून केवळ नातेवाईक म्हणून एकनाथ शिंदे कुणाला आणणार असतील
तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल, हे कुणाही ज्योतिषाकडं जाऊन पाहण्याची गरज नाही.
त्या उमेदवाराशी माझा काडीचाही संबंध नसेल. मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही,
असं सांगत रामदास कदम यांनी इशारा दिला आहे. (Shivsena Shinde Group News)

https://www.instagram.com/p/DAlaH6FpAV4

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Rohit Pawar | ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले…’ सुप्रिया सुळेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या – ‘शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर…’

Maharashtra Politics | फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला; भाजपचे कार्यकर्ते चिंतेत

You may have missed