Eknath Shinde To Amit Shah | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अपेक्षित जागा अमित शहांकडे मागितल्या; शहा म्हणाले – “आता जागावाटपाच्या विषयावर…”
मुंबई: Eknath Shinde To Amit Shah | मागील दोन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत (Amit Shah Mumbai Visit). दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) आणू अशी ग्वाही अमित शहांना दिल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
https://www.instagram.com/p/DAldwGhpRx7
तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप आणि उमेदवारी घोषित करायला वेळ घालवायला नको. जागावाटप लवकर जाहीर करायला हवं अशी विनंती शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथिगृहामध्ये झालेल्या बैठकीत शिंदे यांनी ही मागणी केल्याची माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAlixGqtgBR
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या जागा का हव्या आहेत याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना दिली. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजना या लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचल्या आहेत यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचेही शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितल्याचे समोर आले आहे.
https://www.instagram.com/p/DAlowDjC6e4
दरम्यान, जागावाटपाच्या विषयावर समन्वय साधून मार्ग काढू अशी ग्वाही अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली. तसेच महायुतीमध्ये विसंवाद आहे अशी भावना लोकांसमोर येऊन देऊ नका, आपापसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र या आणि एकत्र लढा, असा सल्लाही शहा यांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DAlrdyJCJbe
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’